75 out of 133 patients recovered, went home ... 
कोल्हापूर

गडहिंग्लजकरांना दिलासा; 133 पैकी 75 रूग्ण बरे झाले, घरी गेले... 

अजित माध्याळे

गडहिंग्लज : तालुक्‍यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना, दुसऱ्या बाजूला दिलासादायक बातमीही आहे. 133 पैकी 75 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. चौघांचा मृत्यू झाला असून 54 जणांवर कोविड सेंटर व सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तालुक्‍यात मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून नागरिक आपापल्या गावी दाखल झाले. दोन महिन्यात रूग्णांची संख्या नव्वदी पार झाली होती. यातील बरेचसे रूग्ण बरेही होवून गेले होते. मोजण्याइतक्‍या रूग्णांवर उपचार सुरू होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा बाधित रूग्णांचा आलेख वाढू लागला. आता ही संख्या 133 वर पोहचली आहे. गडहिंग्लज शहरातही रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याने तालुक्‍याला धक्का बसला आहे. 

दरम्यान, बाधित रूग्णांवर शेंद्री माळावरील कोविड सेंटर तसेच वृद्ध, लहान मुले आणि इतर व्याधीने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेतील घटकांनी 75 रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश मिळविले आहे. आता 54 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्‍यातील रूग्णांची संख्या वाढत आहे. 

बाहेरून आलेल्या नागरिकांना अलगीकरण करण्यासंदर्भात गोंधळ उडाल्याने स्थानिक संसर्गही वाढत आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात 25 स्थानिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. वेळीच खबरदारी घेतली नाही तर ही संख्या वाढण्याचा धोका आहे. यामुळे ग्राम व प्रभाग समित्यांनी सतर्क राहून अलगीकरणाचे नियम कडक पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

दृष्टिक्षेप 
- कोविड सेंटरमध्ये 54 जणांवर उपचार सुरू 
- आतापर्यंत तालुक्‍यात 4 जणांचा मृत्यू 
- दोन महिन्यात रूग्णांचा 90 आकडा पार 
- कोरोना बाधितांची संख्या पोचली 133 वर 

- 25 स्थानिक नागरिकांना बाधा 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT