bus stand google
कोल्हापूर

कोल्हापूर : ८ बसस्थानकांना मिळणार ‘नवा लूक’

परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील; ११ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वस्त्रनगरी इचलकरंजी, गडहिंग्लज, कागलसह जिल्ह्यातील ८ बसस्थानकांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. त्यांच्या नूतनीकरणासाठी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये हजारो प्रवाशांची वर्दळ असते. ही बसस्थानके विकसित होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इचलकरंजी, गडहिंग्लज बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी, तर जयसिंगपूर बसस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी प्रत्येकी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वाठार बसस्थानक पुनर्बांधणीसाठी दीड कोटी रुपये, तर वडगाव बसस्थानक नूतनीकरणासाठी १ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर कागल, गगनबावडा व मलकापूर बसस्थानक नूतनीकरणासाठी प्रत्येकी १ कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आठही बसस्थानकांच्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये नवीन इमारतीसह सुशोभीकरण, काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, हायमास्ट दिवे आदी कामे होणार आहेत. हे काम राज्यातील अन्य बसस्थानकांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT