8 year boy died on the s8 year boy died on the spot due to electric shock in Market Yard area around8 year boy died on the spot due to electric shock in Market Yard area aroundpot due to electric shock in Market Yard area around 
कोल्हापूर

आईने केला आक्रोश : गोठ्यात दूध आणण्यासाठी गेलेल्या बसवराजवर काळाने घातला घाला

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : येथील मार्केट यार्ड परिसरात आज सायंकाळी सातच्या सुमारास वीजवाहिनीचा शॉक लागून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. बसवराज दत्ता जाधव (वय ८) असे त्याचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबतची माहिती अशी 

जाधव कुटुंबीय मेटाचा मार्ग परिसरात राहते. तेथून मार्केट यार्ड परिसरात येण्यासाठी पायवाट आहे. मार्केट यार्ड परिसरातील गोठ्यात दूध आणण्यासाठी बसवराज सायंकाळी येत होता. दरम्यान, पावसात वीजवाहिनी तुटून पडली होती. ते बसवराजच्या लक्षात आले नाही. चालत येत असताना त्याचा वाहिनीला स्पर्श होताच जोराचा धक्का बसला आणि तो लांब फेकला गेला. ही घटना सोबत असणाऱ्या मुलाने पाहून घरी जाऊन सांगितली.

लोकांनी घटनास्थळी येऊन बसवराजला लाकडाच्या सहाय्याने बाजूला केले व दवाखान्यात नेले; परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या आईने आक्रोश केला. बसवराज सावित्रीबाई फुले विद्यालयात दुसरीत शिकत होता. वडील हॉटेल कामगार असून, आई मोलमजुरी करते. त्याला भाऊ आहे. रोजगारासाठी हे कुटुंब बाहेरून येऊन येथे राहिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांत सुरू होती. विच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

संपादन -अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT