800 Bus Rounds Canceled In Three Days In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

तीन दिवसात 800 फेऱ्या रद्द

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच घटकांना जाणवत आहे. त्यामुळे सारे जनजीवन कोलमडले आहे. सर्वसामान्यांची लाल परीही यातून सुटलेली नाही. कोरोनाचा धसका आणि खबरदारीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. दिवसागणिक त्यामध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल 800 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, दररोज एक लाख 80 हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. पुढील काही दिवसात यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसचा इफेक्‍ट वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण नसला तरी खबरदारीच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत. गडहिंग्लज तालुकाही त्याला अपवाद ठरलेला नाही. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मेळाव्यांना बंदी घातली आहे. आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. ग्रामदैवत काळभैरी मंदिराचे दर्शन बंद केले आहे. उद्याने, वाचनालय, जलतरण तलावाला टाळेबंदी केली आहे. या साऱ्यामुळे जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. 

सहाजिकच या साऱ्याचा परिणाम येथील एसटी आगारावर झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा धसका घेतल्याने, तसेच खबरदारी म्हणून नागरीकांनी स्वत:वर बंधणे घालून घेतली आहेत. निकडीच्या कामासाठीच लोक बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवाशी घटले आहेत. खबरदारीचा उपाय आणि बदलत्या परिस्थितीचा विचार करून एसटी प्रशासनाने 16 मार्चपासून तीन दिवसात 800 फेऱ्या रद्द केल्या आहेत. या फेऱ्या 20 हजार 706 किलोमीटर अंतराच्या होत्या. एकूण पाच लाख 56 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच दिवसागणिक प्रवाशांची संख्या घटत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात यामध्ये वाढच होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

आगाराकडून दक्षता... 
गडहिंग्लज एसटी आगाराकडून दक्षता घेतली जात आहे. दररोज सर्व गाड्या डेटॉलने स्वच्छ धुतल्या जात आहेत. आगारात बाहेरून गाडी आल्यानंतर प्रवाशांचे हात लागलेली बाकडी व बार पुसले जात आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले आहे. प्रवाशांच्या तपासणीसाठी आगारात आजपासून बुथ उभारण्यात आल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक सौ. एस. एस. मनगुतकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT