88 CNG pumps to be set up in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात होणार ८८ सीएनजी पंप; वाढत्या इंदन दरवाढिला पर्याय 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - जिल्ह्यात तब्बल ८८ ठिकाणी सीएनजी पंप होणार आहेत. त्याचा सर्व्हे झाला असून कोल्हापूर शहरात तीन आणि परिसरात दोन पंप वाढणार आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात हे पंप सुरू होण्याची 
शक्‍यता आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे गेल्यामुळे मोटारींसाठी सीएनजी (कॉम्प्रेस्ड्‌ नॅचरल गॅस) हा पर्याय पुढे आला. सध्या सीएनजी रत्नागिरी जिल्ह्यातून मागविला जातो; मात्र लवकरच तो  कोल्हापुरात उपलब्ध होणार असल्यामुळे स्वस्त मिळणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते.

लॉकडाउननंतर काहींच्या नोकऱ्या गेल्या. काहींना कमी पगारात काम करावे लागले. त्यात महागाई वाढत आहे, पेट्रोलचे दर ९४ रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे पेट्रोलला पर्याय म्हणून सीएनजीला प्राधान्य मिळत आहे. पुणे-मुंबईसह दिल्लीत सीएनजीचे जाळे आहे; मात्र आता पुणे-बंगळूर रस्त्यावर पेठवडगाव, अंबप, वाठार, वारणा परिसरात आणि  हेर्लेजवळ पाच पंप सुरू झाले आहेत. 
जिल्ह्यात तेल कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार ८८ ठिकाणी हे पंप प्रस्तावित आहेत. कोल्हापूर शहरात राजारामपुरी, उद्यमनगर येथे काम सुरू आहे. वाघबीळ परिसर, गोकुळ शिरगाव परिसरात दोन पंपांचे काम सुरू आहे. शहराबाहेर कऱ्हाड, कर्नाटक, रत्नागिरीतही जाळे विस्तारत आहे.

गणित पैशाचे
 सीएनजी ः ६७ रुपये किलो 
 किलोला -३० किलोमीटर ॲव्हरेज
 किलोमीटरला खर्च- २ रुपये ३३ पैसे
 सेंटर कोल्हापुरात झाल्यावर प्रत्येक किलोमीटरला -१ रुपया ७३ पैसे

 पेट्रोल ९४.०० लिटर
 लिटरला २०-२५ किलोमीटर ॲव्हरेज
 प्रत्येक किलोमीटरला अंदाजित खर्च ४.००
 दर शंभरीपर्यंत गेल्यास किलोमीटरला खर्च ५ रुपयांवर

सध्या रत्नागिरीतून सीएनजी आणला जातो. त्याचे रिफिलिंग सेंटर टोप संभापूर परिसरात होते. वर्षाभरात हे काम पूर्ण झाल्यास सध्याच्या दरापेक्षा आणखी दहा-पंधरा रुपयांनी स्वस्त गॅस मिळेल. जुन्या आणि नव्या गाड्यांनाही उपयोग होणार आहे. जिल्ह्यात ८८ पंपांचे नियोजन असून सीएनजी किट बसविणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

- सुभाष माळवी, अधिकृत गॅसकिट फिटर

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT