90 people came in contact with Khutalwadi doctor 
कोल्हापूर

खुटाळवाडीच्या डॉक्‍टरच्या संपर्कात आले 90 जण; क्वारंटाईन 50 जण 

दिग्विजय कुंभार

आंबा : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील स्थानिक डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर बांबवडे परिसरातील दहा गावे कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट केल्याचे शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी जाहीर केले. 

दरम्यान संबंधीत डॉक्‍टरच्या स्वॅबचा रिपोर्ट रविवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. या अगोदर त्यांचा खासगी प्रयोगशाळेत घेतलेला रिपोर्ट पॉझिटिव्हच आला होता. या डॉक्‍टरच्या संपर्कात आलेल्या आणखी 55 लोकांना क्वॉरंटाइन केले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 90 झाली आहे. यापैकी 50 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिली. 

दरम्यान मलकापूर, सरुड, येळाणे या वर्दळीच्या प्रमुख ठिकाणी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. कंन्टेनमेंट झोन व जनता कर्फ्यूमधील गावांत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. येथील स्थानिक डॉक्‍टरला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता तालुक्‍यातील खुटाळवाडी, बांबवडे, डोणोली, वाडीचरण, सुपात्रे, साळशी, सोनवडे, भाडळे, चरण व ठमकेवाडी ही दहा गावे कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. 

सात किलोमीटर क्षेत्रातील सरूड, खामकरवाडी, शिंपे, गोगवे, शित्तूर तर्फ मलकापूर, हणमंतवाडी, चरण, सैदापूर, थेरगाव, पाटणे, सावे, बजागेवाडी, व्हनांगडेवाडी, पिशवी, वरेवाडी, भैरेवाडी, सावर्डे बुद्रुक, पिंपळेवाडी, परखंदळे, कुंभारवाडी ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट केली आहेत. 

दृष्टिक्षेप 
- बांबवडे परिसरातील 10 गावे कंटेन्मेंट झोन 
- डॉक्‍टरचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह 
- डॉक्‍टरच्या संपर्कात 90 जण, क्वारंटाईन 50 जण 
- वर्दळीच्या ठिकाणी जनता कर्फ्यु 
- सात किलोमीटर क्षेत्रातील गावे बफर झोनमध्ये 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT