Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हयातील पर्यटन स्थळांसाठी ९०० कोटी मागणार

पुरातत्व विभागाकडे असलेल्या जिल्हयातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी ९०० कोटींची मागणी केंद्र शासनाकडे करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पुरातत्व विभागाकडे असलेल्या जिल्हयातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांसह करवीरनिवासिनी आई अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ल्यासाठी ९०० कोटींची मागणी केंद्र शासनाकडे करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘१०० कोटी निधीतून पर्यटनस्थळांचे जतन, संवर्धन, दुरूस्ती व परिसर विकासाची कामे केली जातील. केंद्राकडे असलेल्या व पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केला जात आहे.

यासाठी वास्तुविशारद नियुक्त केले आहेत. जिल्हयातील मंदिरे व गडकिल्ल्यांबाबत ४ नोव्हेंबरला पर्यटन विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक कोल्हापुरात आहेत. गोवा येथील असूनही त्यांची नाळ कोल्हापूरशी जुळलेली आहे. त्यांनी यापूर्वी कोल्हापूरला निधी देणार असल्याचे जाहीर केले होते.

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांची जतन व दुरुस्तीसाठी १३ कोटी ५२ लाखांना तांत्रिक मंजुरी देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. दोन स्मारकांची तांत्रिक मंजुरी मिळाली असून उर्वरित पाच प्रस्तावांची तांत्रिक मंजुरी तीन दिवसांत मिळेल.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, डॉ.विलास वहाणे, पुरातत्व विभागाच्या वास्तुविशारद स्मिता पाटील, वैदही खेबुडकर, प्रियंका दापोलीकर उपस्थित होते.

निधी मिळालेली पर्यटनस्थळे
पांडवदरा लेणी मसाई पठार ६४ लाख ७९ हजार, आरेतील महादेव मंदिरासाठी १ कोटी ५० लाख, भुदरगड किल्ला ३ कोटी ८९ लाख, लक्ष्मी विलास पॅलेस ९३ लाख, रांगणा किल्ला भुदरगड ४ कोटी २८ लाख आणि विशाळगड व बाजीप्रभु, फुलाजीप्रभू देशपांडे समाधीसाठी २ कोटी २८ लाख अशा १३ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT