कोल्हापूर

सवलतीचा गैरवापर : नऊ जणांवर गुन्हे  

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : मालवाहतुकीसाठी दिलेल्या सवलतीचा गैरवापर केल्याप्रकरणी वडगाव व शाहूवाडी पोलिस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तपासणी नाक्‍यावर पोलिसांकडून सुरू असणाऱ्या कसून तपासणीत हे प्रकार उघडकीस आले. 

लॉकडाउन काळात मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी वाहनामध्ये चालक, अतिरिक्त चालकासह क्‍लीनर अशी सवलत देण्यात आली आहे. दिलेल्या सवलतीचे मालवाहतूक करणाऱ्यांकडून उल्लंघन होऊ नये याची दक्षता जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक तपासणी नाक्‍यात पोलिसांकडून घेतली जात आहे. प्रत्येक मालवाहतुकीची कसून तपासणी केली जाते. त्यात सवलतीचा गैरवापर करून प्रवासी वाहतूक केल्याचे प्रकारही उघडकीस आले. त्यानुसार नऊ गुन्हे पोलिसांनी दाखल केले. 

वडगाव पोलिस ठाण्यात संशयित महंमद शफिक अहमद (वय 50, वाशीनाका, चेंबूर), इब्रार अहमद आशिक अली (वय 40, रा. भदईपूर, छितपालगड, प्रतापगड), महंमद करीम मुनवर शरीफ अहमद (वय 37) या तिघांवर अवैध प्रवासी वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.

संपत पाटील (वय 40), संदीप सूर्यवंशी (वय 42), अनिल पाटील (वय 25) यांच्यावर एकत्रित प्रवास केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सय्यद मुक्तार साबीर (वय 28, रा. बंगळूर, कर्नाटक) याच्यावरही गुन्हा दाखल झाला. तसेच शाहूवाडी पोलिस ठाण्यात मल्लेश मरिअप्पा (वय 45), संजीवा यादव (वय 25), हनुमंता यादव (वय 46, तिघे रा. सन ऑफ अंजनिया) व चालक रमेश (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या संशयितांवर गुन्हे दाखल झाले. 

तीन दिवसांत 13 हजारांवर वाहने दाखल... 
गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात 13 हजार 218 मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी जिल्ह्यात प्रवेश केला. त्यापैकी 6,461 वाहने जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेली. 6,749 वाहने जिल्ह्यात आली आहेत. तपासणी नाक्‍यावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. घालून दिलेल्या अटीचे संबंधित वाहनचालकांनी पालन करावे, प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

Akola DPDC : अकोला विद्युत भवनासमोर कॉन्ट्रॅक्टरचा राडा; वर्कऑर्डर वाटपात अनियमितता, चौकशीची मागणी

Solar Rooftop Tax: छतावरील सौरऊर्जेवरील कराचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्या; अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलनाचा इशारा – दीपिका चव्हाण

Raigad: नांदगावात सापडले राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाची खुण, १४व्या शतकातील शिलालेख; फोटो समोर

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

SCROLL FOR NEXT