acb tryap acb tryap
कोल्हापूर

'ACB'ची कारवाई; आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई जाळ्यात

नाहरकत दाखला देण्यासाठी तीन हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायतीचा शिपायावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नाहरकत दाखला देण्यासाठी तीन हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायतीचा शिपायावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३, रा. आंबेवाडी, ता.करवीर) असे संशयिताचे नाव असल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.

याबाबत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदारांच्या हॉटेल परमीटरूममध्ये महापुराराचे पाणी आल्याने नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पंचनम्याकरीता हॉटेल व्यवसाय सुरू असल्याबाबतचा सरपंचाच्या स्वाक्षरीचा ना- हरकत दाखल्याची गरज होती. त्यांनी आंबेवाडी ग्रामपंचायतमध्ये जावून याबाबत चौकशी केली. त्यावेळी येथील शिपाई संशयित शिवाजी चौगलेने हा दाखला देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदारांनी २७ ऑगस्ट ला लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. विभागाच्या पडताळणीत चौगलेने तीन हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चौगलेवर विभागाने कारवाई केली. त्याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक बुधवंत, निरीक्षक सतिश मोरे, कर्मचारी अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रुपेश माने यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT