टी. एस. मोरे sakal
कोल्हापूर

चिक्कोडी कृषी जिल्हा घोषणेच्या हालचालींना वेग

मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची कृषी खात्याला सूचना

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी: शैक्षणिक जिल्ह्याच्या धर्तीवर चिक्कोडीला कृषी जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी बेळगाव जिल्हा कृषक समाजाचे अध्यक्ष टी. एस. मोरे यांच्या पाठपुराव्याला लवकरच यश मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अप्पर सचिवांनी (प्रशासन) याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना राज्याचे कृषी खात्याचे अप्पर मुख्य सचिवांना केली आहे.

कृषी खात्याच्या विविध लोकोपयोगी योजनांची तळागाळात परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्यास चिक्कोडीला कृषी जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा कृषक समाजाचे अध्यक्ष टी. एस. मोरे हे प्रयत्नशील आहेत. जिल्हा कृषक समाजाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी या मागणीचा विविध पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. गेल्या ७ जूनला कृषी खात्याची आढावा बैठक राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झाली होती. बैठकीत टी. एस. मोरे, कुडचीचे आमदार पी. राजीव यांनी चिक्कोडी कृषी जिल्हा जाहीर करण्याच्या आवश्यकतेबाबत सविस्तर बाजू मांडली होती.

यावेळी उपस्थित असलेले खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, आमदार महांतेश दोड्डगौडर, आमदार महेश कुमटळ्ळी यांनीही ही मागणी उचलून धरली होती. याबाबत सरकार पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी दिली होती. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अप्पर सचिवांनी याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना कृषी खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे लवकरच चिक्कोडी कृषी जिल्ह्याची मागणी फलद्रूप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT