कोल्हापूर

प्राधिकरणाचे काम पुन्हा गतीने 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची सुमारे दीड वर्ष थांबलेली प्रक्रिया आता सुरू झाली आहे. प्राधिकरणासाठी हक्काचे तीन अधिकारी मिळणार आहेत. तसेच गुंठेवारी आणि अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील निवृत्त झाल्यामुळे त्याचा कार्यभार पुन्हा नगररचना विभागाकडे आला आहे. आणखी तीन नवीन अधिकारी लवकरच नियुक्त होणार असल्यामुळे प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे. 

शहराची हद्दवाढ न करता परिसरातील 42 गावांसाठी नव्याने प्राधिकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला. या प्राधिकरणाला भक्कम आर्थिक निधी दिला जाईल, गावात विकासगंगा जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, काहीच पूर्तता न झाल्यामुळे गावागावांत उद्रेक होऊ लगला. कोणते गाव प्राधिकरणात घ्यायचे या मुद्द्यावरून ते सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यानंतर प्राधिकरण वादाचा मुद्दा ठरला होता. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते प्राधिकरणात येणाऱ्या गावांतील बांधकाम परवान्याचे मुद्दे दीड वर्ष प्रलंबित होते. नुकतीच प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक प्रश्‍नांबाबत बैठक घेऊन बांधकाम परवान्याला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय झाला; मात्र हे करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता होती. त्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. 

सहायक नगररचनाकारांची दोन पदे आणि सहाय्यक लेखाधिकारी असे एक पद भरले जाणार आहे. तात्पुरत्या सेवा करार पद्धतीने ही पदे भरली जात आहेत. पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी (ता. 15) सायंकाळी सहापर्यंत होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT