Accelerated Approval Of Ichalkaranji Sports Complex Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीतील क्रीडा संकुलाच्या मंजुरीला गती 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : शहापूर येथे केंद्र शासनाच्या "खेलो इंडिया' अंतर्गत लवकरच भव्य क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्पोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चे अधिकारी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी उद्या (मंगळवार) करणार आहेत. त्यानंतर या प्रस्तावाच्या मंजुरीला गती मिळणार आहे. 

ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांत नैपुण्य प्राप्त करता यावे, यासाठी केंद्र शासनाच्या "खेलो इंडिया' अंतर्गत भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून 100 टक्के अनुदान मिळते. त्यानुसार इचलकरंजी पालिकेच्या माध्यमातून तब्बल 12 कोटी 43 लाख 17 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तत्कालिन आमदार सुरेश हाळवणकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. यापूर्वीच राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. 

याबाबतचा पालिका प्रशासनाकडून सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. कोरोनाच्या संकटामुळे या प्रस्तावाची मंजुरी रखडली होती; मात्र या प्रस्तावानुसार क्रीडा संकुलाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चे राज्यातील अधिकारी उद्या (ता. 29) शहरात येणार आहेत. या जागेची पाहणी केल्यानंतर या प्रस्तावाच्या मंजुरीला अधिक गती येणार आहे. 

शहराला क्रीडा चळवळीची परंपरा 
इचलकरंजी औद्योगिक नगरी असली तरी येथे क्रीडा चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे; पण अद्यापही आवश्‍यक सुविधांची कमतरता आहे. नियोजित क्रीडा संकुल साकारल्यास इचलकरंजीसह परिसरातील क्रीडा चळवळीला अधिक बळ मिळणार आहे. 

क्रीडा संकुलातील ठळक बाबी 
- 200 मीटर रनिंग ट्रॅक 
- ऍथलॅटिक स्टेडियम 
- कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो मैदान 
- जलतरण तलाव 
- बॅडमिंटन हॉल 
- शूटिंग रेंज 
- रोल बॉल 
- लॉन टेनिस. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT