accident of 4 year child in belgaum two wheeler driver arrested by police 
कोल्हापूर

हृदयद्रावक ; हेडफोनने घेतला चार वर्षाच्या मुलाचा जीव

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कानात हेडफोन घालून सुसाट वेगाने चाललेल्या दुचाकीचालकाने गणपत गल्लीतील चार वर्षाच्या मुलाला उडविले. या धडकेत मुलगा खाली पडल्यानंतर दुचाकीची दोन्ही चाके त्याच्या पोटावरून गेली. शिवाय मुलाच्या डोक्‍यालाही दुखापत झाली. या घटनेनंतर गणपत गल्लीतील नागरिकांनी पाठलाग करून त्या दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, जखमी मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, दुचाकीसोबत मुलगा दहा ते पंधरा फूट फरफटत गेला. घटना घडल्यानंतर नागरिकांनी आरडाओरड सुरू केली, पण दुचाकीचालकाने कानात हेडफोन घातल्यामुळे त्याला काहीच ऐकू आले नाही. घटना घडल्यानंतर दुचाकीचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण भातकांडे गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसानी वेळेत तेथे जाऊन दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. घटनेनंतर गणपत गल्लीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमी चार वर्षाचा मुलगा आई-वडिलांसह गणपत गल्लीतून निघाला होता. त्याचवेळी सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीचालकाने त्या मुलाला उडविले. सायंकाळी गणपत गल्लीत गर्दी असते. बेळगावच्या मुख्य बाजारपेठेचा हा भाग असला तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तेथे एकेरी वाहतूक व्यवस्था आहे. तरीही तेथे दुहेरी वाहतूक सुरूच असते. शिवाय गर्दीतून बेफाम वाहने चालविण्याचा प्रकारही अनेकदा घडतो. पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे असे प्रकार घडतात. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानंतर तरी पोलिसांनी बेफाम वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT