accident in kabnur of sugarcane tractor one person died in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : कबनूरात उसाचा ट्रॅक्टर पलटी; एकजण जागीच ठार

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : कबनूर (ता. हातकणंगले) येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रेमचंद अशोक काडाप्पा (वय 52, रा. कबनूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दिलीप महादेव आवळे (वय 55) आणि उदय संभाजी इंगवले (वय 50, दोघे रा. कबनूर) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात कोल्हापूर रोडवरील ओढ्याजवळ पंचगंगा साखर कारखान्याकडे वळणाऱ्या बायपास मार्गावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. 

कबनूर येथे ओढ्याजवळ असलेल्या बायपास रोड वरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पंचगंगा साखर कारखान्याकडे चालला होता. वळणावरच ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली प्रेमचंद काडाप्पा, दिलीप आवळे व उदय इंगवले हे तिघे सापडले. नागरिकांनी आरडाओरडा केला तर काहींनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. नागरिकांच्या मदतीने ऊसाखाली सापडलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली.

जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रेमचंद काडाप्पा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT