accident in kolhapur gaganbawda road four people are dead return from relatives in kolhapur
accident in kolhapur gaganbawda road four people are dead return from relatives in kolhapur 
कोल्हापूर

हृदयद्रावक ; अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

कुंडलिक पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कळंबे गावाजवळ एसटी आणि इनोवा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर कुटुंब विक्रमनगर कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. जखमींना सीपीआरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान माळवे कुटुंबीय सकाळी साडेनऊच्या सुमारास हे कळे येथील आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी चालले होते. एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. कणकवली डेपोतील एसटी व मारुती कार (MH 09 BW 41 41) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात करण दिपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (वय ४४), आक्काताई माळवे (वय ६५) ही जागेवरच ठार झाली आहेत. जखमी चार व्यक्तींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात गाडीचा समोरील भाग पूर्णत: खिळखीळा झाला आहे. 

अपघातातील समर्थ संजय माळवे (वय १६), नंदा दिपक माळवे (वय ४०), पूजा संजय माळवे (वय ३६), सुनिता भगवान चौगले (वय ५०) अशी जखमींची नावे आहे. या कुटुंबाचे मुळ गाव कळे आहे. या मार्गावर अपघातानंतर काही  तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT