accident in kolhapur murgud tractor collapse of rift in kolhapur 
कोल्हापूर

दुर्दैव! सहा वर्षानंतर परत तेच घडलं ; बापासारखचं मरण पोराच्या नशीबी आलं

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड (कोल्हापूर) : मळगे खुर्द ते मळगे बुद्रुक मार्गावर अस्वलेच्या विहिरीलगतच्या ओढ्यात भरधाव ट्रॅक्‍टर (एमएच ०९ सीजे ४४९६) कोसळून तरुण ठार झाला. ही घटना काल दुपारी घडली. सत्यजित दत्तात्रय पाटील (वय २३, रा. मळगे खुर्द) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : मळगे खुर्द येथील सत्यजित दत्तात्रय पाटील आज दुपारी ट्रॅक्‍टर घेऊन भरधाव मळगे खुर्द ते मळगे बुद्रुक दरम्यानच्या मार्गावरून जात होता. या मार्गावर अस्वलेच्या विहिरीलगत असणाऱ्या ओढ्यात ट्रॅक्‍टर कोसळला. ट्रॅक्‍टरखाली सत्यजित सापडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले; पण उचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची फिर्याद भाऊ सचिन दत्तात्रय पाटील यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.

असाच अपघात...

काल झालेल्या अपघातातील मृत तरुण सत्यजित याचे वडील दत्तात्रय पाटील यांचा सहा वर्षांपूर्वी मुरगूड-निपाणी मार्गावर यमगेच्या कुंभार गेटजवळील ओढ्यात ट्रॅक्‍टर पडून मृत्यू झाला होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT