Accident near Saundalga One is serious kolhapur marathi news 
कोल्हापूर

ट्रकखाली दुचाकी गेल्याने दोघे जखमी,  सौंदलग्याजवळ अपघात : एक जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असलेल्या सौंदलगा हद्दीत ब्रीज नजीक ट्रकखाली गेल्याने 
सौंदलगा-कुर्ली येथील दुचाकीवरील दोघे जखमी झाले. बुधवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. श्रीकांत शामराव वड्डर (वय ५५, रा. सौंदलगा) व दीपक शिंत्रे (वय ३५, रा. कुर्ली) अशी जखमींची नावे आहेत.  

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, 

श्रीकांत वड्डर, व दीपक शिंत्रे हे ब्रीज खालून आपल्या घराकडे दुचाकी (एमएच ११ डी ९७९७) घेऊन निघाले होते. ट्रक चालकाचा रस्ता चुकल्यामुळे ट्रक (बीबीसी १३ एल ८९९३) मांगूर फाट्यावरून परतून लोकल रोडवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. सौंदलगा येथील गावामध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी असलेल्या ब्रीज जवळ ट्रक व दुचाकीची जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकी ट्रकच्या खाली जाऊन त्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली.  तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच निपाणी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल तौशिफ मुजावर यांनी धाव घेतली. तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना निपाणीच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. महामार्गाशेजारी असलेल्या लोकल रोडवरील थांबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.श्रीकांत शामराव वडर हे कागल येथे शिक्षक आहेत.त्यांना निपाणीहुन सीटी हॉस्पिटल कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT