amba esakal
कोल्हापूर

गणपुतीपुळ्याला जाणारी चारचाकी कोसळली दरीत; महिलेसह बालक जागीच ठार

दोन कुटुंबीय गाड्यांमधून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे निघाले होते.

दिग्विजय कुंभार

दोन कुटुंबीय गाड्यांमधून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे निघाले होते.

आंबा - तीनशे फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विसावा पॉइंट येथील वळणावर हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारासा घडला. (Accident News) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली आहे. यात मृत्यु झालेल्या बालकाचे नाव शिवांश संतोष हरकुडे असून त्याच्या मृत्यु झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. हे दोघे सांगली येथील आहेत. (Amba ghat)

सांगली येथील डॉ. हरकुडे व डॉ. फुलारे कुटुंबीय दोन गाड्यांमधून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे निघाले होते. कारमध्ये संतोष हरकुडे (वय ३५) पत्नी सृष्टी (वय ३२) मुलगा शिवांश (वय ३ महिने) मुलगी मन्मिता (वय ३) सागर हरकुडे, पत्नी जयश्री, डॉ. प्रताप तंबाखे (वय ७०) डॉ. संगमेश फुलारे (वय ३) पत्नी डॉ. दीप्ती (वय ३३) मुलगी आज्ञा (वय ६) वर्षे आणि तीन वर्षाचा रेहान प्रणव सुभेदार प्रवास करत होते. विसाव्या पॉइंट वरून निसर्ग सौंदर्य व फोटोग्राफी करुन यामधील एक गाडी गणपतीपुळेच्या (Ganpatipule) दिशेने गेली. मागून आलेल्या कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती समजताच मुर्शी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबवली. यामधील जखमी झालेल्या तीन लहान बालकांना दरीतून काढून पुढील उपचारासाठी मलकापूरातील ग्रामीण रुग्णालय व कोल्हापूरातील सीपीआर रूग्णालयात (CPR) दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT