accident in peth vadgaon kolhapur one person dead and two injured
accident in peth vadgaon kolhapur one person dead and two injured 
कोल्हापूर

दर्शनासाठी निघालेल्या दुचाकीला मोटारीची धडक ; एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव (कोल्हापूर) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार पुलाजवळ मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी बाबूराव रघुनाथ पाटील (वय 70, रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारे जावई दीपक शिंदे (वय 38), त्यांची मुलगी सिद्धेश्‍वरी (वय 8, दोघे रा. बत्तीस शिराळा) गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत. 

दीपक शिंदे व त्यांचे सासरे बाबूराव पाटील, मुलगी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी मोटारसायकलने जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर वाठारजवळ मागुन येणारी मोटार (एमएच 10, सीएम 4000) ने कोल्हापूरकडे जाणाऱ्या मोटारसायलकला धडक दिली. यात मोटारसायकलवरील तिघे फरफटत गेले. यामध्ये बाबूराव पाटील यांच्या डोक्‍यास गंभीर इजा झाली.

याशिवाय मुलगी, दीपक शिंदे जखमी झाले. तिघांना खाजगी रुग्णालयात हलवले. बाबूराव पाटील यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मुलगी व तिचे वडील गंभीर जखमी झाले. या वेळी मोटारचालक जखमींना औषधोपचारासाठी घेऊन गेला मात्र वाटेत रुग्णवाहिकेला बोलावून त्याने पळ काढला. या प्रकरणी दीपक शिंदे (बत्तीस शिराळा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास हवालदार दुकाने करीत आहेत.  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT