accident of pregnant women of 5 months dead in kagal kolhapur 
कोल्हापूर

हृदयद्रावक ; तपासणीसाठी निघालेल्या गर्भवतीचा वाटेतच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : भरधाव वेगात चाललेल्या ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. कागल-निढोरी रस्त्यावर व्हन्नूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. छाया संदीप भराडे (वय ३३) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 

दौलतवाडी (ता . कागल) येथील संदीप भराडे पत्नी छाया (वय ३३) यांना तपासणीकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात चालले होते. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. व्हन्नूर फाट्याजवळ थांबलेल्या ऊसाच्या बैलगाडीला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने भराडे यांच्या मोटरसायकलीला जोरात ठोकरले. त्यामुळे संदीपसह छाया भराडे मोटरसायकलीवरून  रस्त्यावर कोसळल्या. पोटावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

संदीप यांना किरकोळ दुखापत झाली आहे.  दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी भेट देउन  घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर छाया यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कागलच्या गामीण रुग्णालयात नेण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT