कोल्हापूर

लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात अपघात घट

राजेश मोरे

कोल्हापूर ः कोरोनाच्या संकटाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहनांचीच संख्या कमी झाली. तसे अपघताचे प्रमाण कमी झाले. जिल्ह्यात या काळात 130 अपघातांची नोंद झाली. शहराचेही प्रमाण अत्यल्प राहिल्याने ही बाब जिल्ह्यावासीयांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली. 
वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. तशी वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन न केल्याने अपघातांचीही संख्या वाढू लागली आहे. तसा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील गंभीर अपघाताचे प्रमाण हे तीनशेहून अधिक राहिले. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर पोलिस प्रशासनाकडूनही अनेक प्रयत्न केले जातात. चौकातील गर्दीच्या ठिकाणी सिग्नल, ऐकरी वाहतूक, नो पार्किंग झोन, दिशादर्शक फलक अशा उपायोजनाही केल्या जातात. 
कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाला. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली. अत्यावश्‍यक सेवेतील वाहना व्यतिरिक्त इतर वाहने रस्त्यावर नसल्याने अपाआपोच अपघाताचे धोकेही कमी झाले. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर अपघाताच्या संख्या थोडी वाढू लागली. पण अद्याप केएमटी, एस.टी बससह अवजड वाहानांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी झाल्याचेही चित्र शहर परिसरात पहावयास मिळते. लॉकडाउन काळातील ऑगस्ट अखेर 130 गंभीर अपघाताची तर शहरातील सर्व अपघातांची संख्या ही 45 इतकी राहिली. कोरोना महामारीत अपघाताचे कमी होणारे प्रमाण जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारे ठरले.

जिल्ह्यातील अपघात संख्या 
सन अपघात उघड 
2018 321 293 
2019 316 274 
---------------- 
मार्च ते ऑगस्ट 2020 अखेर जिल्ह्यातील अपघात 
माहे अपघात उघड 
मार्च 22 18 
एप्रिल 6 5 
मे 42 33 
जून 22 21 
जुलै 21 19 
ऑगस्ट 17 13 

शहरात मार्च महिन्यापासून दाखल अपघाताची स्थिती... 
शाहूपुरी पोलिस ठाणे - 19 
जुना राजवाडा - 9 
राजारामपुरी - 16 
लक्ष्मीपुरी - 1

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT