accident of two wheeler and tempo in radhanagari road one person dead in kolhapur 
कोल्हापूर

वर्षाअखेरीस गावकरी हळहळले ; टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : येळवडे -राशिवडे (ता.राधानगरी) या रस्त्यादरम्यान दुचाकीस्वार आणि टेम्पोची धडक होऊन एकजण जागीच ठार झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय 56 रा. पुंगाव ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावापासून जवळच असलेल्या दत्त मंदिरा शेजारी सारजाई नावाच्या ओढ्यावर हा अपघात झाला.

घडलेली घटना अशी, सकाळी कुलकर्णी हे घरगुती गॅस सिलेंडर आणण्यासाठी दुचाकीवरुन राशिवडेकडे निघाले होते. त्याच दरम्यान राशिवडे येथील मालवाहू टेम्पो येळवडेच्या दिशेने पुढे चालला होता. याचवेळी दुचाकी टेंपोच्या पुढच्या चाकाला धडकल्याने पाय मोडून कुलकर्णी यांचे डोके टेंपोच्या बाजूपट्टीवर जोरात धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अंमलदार गणेश पाटील, अरविंद पाटील यांनी पंचनामा करुन वाहने ताब्यात घेतली.

अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. वर्षाखेरीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे पुंगावकरांना धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलीसांनी रस्त्यावरील वाहतुक सुरळीत लावून मृतदेह शव विच्छेदनासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविला आहे.  कुलकर्णी  यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT