Accidental death of Dr Arun Morale Kavathe Mahankal sangli
Accidental death of Dr Arun Morale Kavathe Mahankal sangli sakal
कोल्हापूर

डाॅ.अरूण मोराळेंचा कवठेमहांकाळात अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात 108 रुग्णवाहिकेचे नोडल ऑफिसर अरुण राजाराम मोराळे (वय 65, रा. मनिषा नगर एसएससी बोर्ड रिंग रोड जवळ कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणाचा हा सातवा बळी ठरला. 108 रुग्णवाहिकेच्या नोडल ऑफिसर पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी लातूर येथे जात असताना मोराळे यांच्या चारचाकी गाडी (क्र. एमएच 09- 4644) मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने मोराळे यांचा जागीच मृत्यू झाला.

कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.डॉक्टर मोराळे हे शासकीय रुग्णालयातून निवृत्त झाले होते नुकताच त्यांनी महापालिकेजवळ नवीन रुग्णालये सुरु केले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलगा ही डॉक्टर असून ते सध्या मनिषा नगर येथे राहतात तर मुलगी डॉक्टर असून ती मुंबईत असते. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ बार्शी या गावी नेण्यात येणार असल्याचे त्यांचा मुलगा डॉ मुलगा नरेश यांनी सांगितले.डॉक्टर अरुण मोराळे यांनी सरकारी सेवेत असताना सीपीआर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयासह हातकणंगले आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा प्रामाणिक सेवा बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT