कोल्हापूर

भष्ट्राचार विरोधात पुणे विभागात  कारवाईचा धडाका ; 123 गुन्ह्यांची नोंद 

राजेश मोरे

कोल्हापूर : कोरोना संकटातही भ्रष्टाचार थांबलेला नाही. भ्रष्टाचारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मुळावर घाव घालण्याचा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. या वर्षात भ्रष्टाचारविरोधी कारवाईत पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. लाचसंदर्भातील संपूर्ण परिक्षेत्रात 548 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील पुणे विभागात 123 गुन्ह्यांची नोंद झाली. 
भ्रष्टाचारी लोकसेवकांवर कारवाईचे अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आहेत; पण या संदर्भात तक्रारीचे प्रमाण कमी असल्याने कारवाईवर मर्यादा येतात. शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील सामान्य नागरिकांची कामे सहज व्हावीत, ही अपेक्षा असते. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रबोधनाची मोहीम राबवली जाते. त्यामुळे चार ते पाच वर्षांत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही महिने कार्यालये बंद होती. परिणामी तक्रारींचे प्रमाण कमी झाले. तरीही पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर हा पुणे विभाग कारवाईत राज्यात अव्वल ठरला. 
 
राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे स्वरूप 1 जानेवारी ते 16 नोव्हेंबरअखेर 

-परिक्षेत्र सापळा अपसंपदा अन्य भ्रष्टाचार एकूण 
गुन्हे आरोपी गुन्हे आरोपी गुन्हे आरोपी गुन्हे आरोपी 
*मुंबई* 18* 28* 3* 6* -* -* 21* 34* 
*ठाणे* 40* 60* 1* 2* -* -* 41* 62* 
*पुणे* 123* 174* 1* 4* 2* 5* 126* 183* 
*नाशिक* 85 * 107* 3* 6* -* -* 88* 113* 
*नागपूर* 67* 86* 2* 3* 9* 37* 78* 126* 
*अमरावती* 75* 104* -* -* 9* 65* 84* 169* 
*औरंगाबाद* 77* 104* -* -* 1* 4* 78* 108* 
*नांदेड* 63* 86* -* -* -* -* 63* 86* 
-------------------- 
*एकूण ः 548* 749* 10* 21* 21* 111* 579* 881* 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT