Action against five senior officer kolhapur 
कोल्हापूर

‘लाचे’तील मोठे मासे गळाला: पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई 

राजेश मोरे

कोल्हापूर : लाच मागण्याची प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आता मुळापर्यंत जाऊन कारवाईचा धडका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावला. या वर्षात लाचेच्या प्रकरणात वर्ग एकच्या पाच अधिकाऱ्यांवर कारवाई करीत, त्याची झलकही विभागाने दाखवून दिली. 


लाच मागणीत यंदा महसूल व पोलिस विभाग आघाडीवर राहिल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कामे विनाविलंब व्हावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. या यंत्रणेत भ्रष्टाचाराचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते. पण, त्यासाठी तक्रारी देण्याकरिता नागरिकांना पुढे यावे लागते. यासाठी विभागाकडून काही वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. त्याला यश मिळत असून, तक्रारीचे 

प्रमाण वाढू लागले आहे. लाचेच्या मागणीबाबतची तक्रार आल्यावर मागणी करणाऱ्यासह ती स्वीकारणाऱ्यावर सर्वसाधारण कारवाई केली जात होती. पण, विभागाने लाच मागण्याची प्रवृत्ती मुळासकट मोडून काढण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. लाच मागणीच्या प्रक्रियेत मोठ्या माशाबरोबर प्रत्येक घटकावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ११ महिन्यांत विभागाने वर्ग एकच्या तब्बल पाच अधिकाऱ्यांना जाळात पकडले.


वर्ग १ चे पाच अधिकारी जाळ्यात...
मस्यविभाग, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वैद्यकीय अधीक्षक आणि महावितरण विभागातील वर्ग एकच्या पाच अधिकाऱ्यांवर यंदा आतापर्यंत लाचलुचपत विभागाने कारवाई केली.


संपादन- अर्चना बनगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT