Action against teachers in Radhanagari Sanctuary 
कोल्हापूर

बंदी असताना शिक्षकांनीच केला अतिसंवेदनशील क्षेत्रात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : राधानगरी अभयारण्याच्या अत्यंत संवेदनशील परिसरात कोल्हापूर येथील काही शिक्षक मंडळींनी शनिवारी (ता. २१) रात्री शिरकाव केला. अवैधरीत्या प्रवेश केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तर त्यांना घेऊन जाणाऱ्या वनरक्षकाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली.


अभयारण्याच्या परिसरातील दाजीपूरपासूनचा उत्तरेकडील भाग हा पर्यटकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, दक्षिणेकडील काळम्मावाडी धरण परिसराचा पूर्ण भाग अतिसंवेदनशील म्हणून राखीव आहे. यात कुणालाही प्रवेश नाही. मात्र, शनिवारी (ता. २१) सतीचा माळ येथील सुरंगी गेटपासून आत कोल्हापूर येथील एका पेठेतील काही शिक्षक गाड्या घेऊन नानीवळे वन्यजीव कुटीपर्यंत गेले. ही माहिती स्थानिकांकडून समजल्यावर त्यांनी तातडीने सर्वांना ताब्यात घेतले व दाजीपूर येथील वनक्षेत्रपाल नामदेव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. या सर्व लोकांवर नियमभंगाची कारवाई म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तर रक्षकावर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय अधिकारी विशाल माळी यांनी दिली.


दरम्यान, या सर्व शिक्षकांनी येथील मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम दुपारी केली असल्याची माहिती दाजीपूर येथील वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी दिली. परंतु, अतिसंवेदनशील क्षेत्रात प्रवेश करणे हा गुन्हा असल्याने ही नियमभंगाची कारवाई केली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT