activity of search ghosts new moon in the cemetery panhala kolhapur marathi news 
कोल्हापूर

''सर , तिथं भिंतीमागं कोणतरी दिसतय बघा म्हणताच झालं भुताचं दर्शन 

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा येथील
 श्री नवनाथ हायस्कूल   मुलांनी  तसेच कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूलच्या मुलांसोबत पोहाळे येथील स्मशानभूमीत या शाळेतील ७० मुले सहभागी झाली. आणि शोध भूतांचा हा उपक्रम कालच्या भर आमवस्येच्या दिवशी सांयकाळी ७ रात्री दिड पर्यंत झाला .

 माणसाच्या भीतीतून आणि अज्ञानातून निर्माण झालेली भुताची भीती निघून जावी. मुलांनी प्रत्येक घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहावे. विचार करावा हा या उपक्रमामागील हेतू होता. माणसाच्या आयुष्यात भूत ही संकल्पना कशी आली याचे विवेचन मिलींद यादव यांनी केले. त्यानंतर सर्पमित्र दिनकर चौगले यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना मुलांना खुलवून सांगीतल्या.  "आयुष्यात प्रत्येक गोष्टीला का ? विचारायला शिका.' असे त्यांनी यावेळी मुलांना आवाहन केले . यानंतर वेळ होती, जेवण करून  मध्यरात्री स्मशानात फिरून भूतांचा शोध घेण्याची. जेवण करून मुलं झोपी जाणार इतक्यात स्मशानाच्या दुसऱ्या बाजुच्या भिंतीमागून घंटीचा आवाज  ऐकायला येऊ लागला. मुलांच्या चेहऱ्यावर भीती जाणवू लागली. 

''सर , तिथं भिंतीमागं कोणतरी दिसतय बघा." घाबऱ्या सुरात कोणीतरी भिंतीकडे बोट केले. तिथं सर्वजण पाहतोय तोवर दुसऱ्या उंच भिंतीवरून एक बाई चालत गेली. सर्वजण तिकडे जातोय तोवर स्मशानाच्या शेडमागील झाड जोरजोरात हलू लागले. आमच्यातल्या सुमित धाडसाने त्या भिंतीमागील झाडाकडे गेला व ' ये ... कोण रे तू ?' म्हणत त्या बाईच्या अंगावर धावून गेला खरा पण ती बाई फिरून भिंतीवरून डोळे मोठे करत अंगावर धावून आली तसा सर्व मुलांबरोबर सुमितही पळून गेला. सारी मुलं घाबरून गाडीत जाऊन बसली. काही क्षणातच सर्वांना समजले की समोर आलेलं भूत नसून अंगाभोवती साडी नेसलेला सुनिल पाटील हा पोहाळे गावातील तरूण आहे. 

पूर्वनियोजनानुसार तो साडी गुंडाळून आला होता. हे समजल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला .यामुळे मुलं इतकंच शिकली की, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आपण घाबरलो तर भुतासारख्या अंधश्रद्धा आपल्या मनात पक्क्या होत जातात . 
या उपक्रमासाठी नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे सर्व पदाधिकारी,शिक्षक व कर्मचारी तसेच अनेकांचे सहकार्य लाभले.


दर वर्षी आमच्या शाळेच्या वतीने गावातील स्मशानभूमीत आमवस्येच्या दिवशी शोध भूतांचा हा उपक्रम घेतो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्षे आहे. अंधश्रद्धा व मूलांची भिती दूर व्हावी हा या मागचा हेतू आहे .

चंद्रकांत निकाडे, मुख्याध्यापक , नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते .

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT