actor Rajiv Kapoor memories in kolhapur film industry related marathi news
actor Rajiv Kapoor memories in kolhapur film industry related marathi news 
कोल्हापूर

राजीव कपूर यांना प्रचंड आवडायची कोल्हापूरातील 'ही' ठिकाणे 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  पंचवीस वर्षापूर्वी अख्खं कपूर कुटुंब येथील शालिनी पॅलेसमध्ये वास्तव्यास होते. निमित्त होते, होम प्रॉडक्‍शन असलेल्या "प्रेमग्रंथ' या चित्रपटाच्या शुटींगचे. पन्हाळा, मसाई पठार परिसरात या चित्रपटाचे शुटींग झाले होते आणि "हिना' चित्रपटासाठी आपण उगीचच देशभरात फिरत बसलो. कोल्हापुरातील ठिकाणं तर सर्वात भारी आहेत, असे यावेळी राजीव कपूर सतत आईला सांगत...अशी आठवणी आज अनेकांनी "सकाळ'शी शेअर केल्या. 


"प्रेमग्रंथ' चित्रपटाचे शुटींग 1996 ला येथे झाले. यानिमित्ताने ऋषी कपूर, माधुरी दिक्षीत यांच्यासह कपूर घराण्यातील सदस्य कोल्हापुरात होते. 1991 साली "हिना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी वापरलेल्या शुटींग लोकेशन्सपेक्षाही कोल्हापूर जिल्ह्यातील लोकेशन्स संपूर्ण कपूर परिवाराला आवडली होती आणि म्हणूनच त्यांनी "प्रेमग्रंथ'चे शुटींग येथे केले. राज कपूर यांचा पुतळा उभारणाऱ्या (कै) संभाजी पाटील यांच्यासह शालिनी पॅलेस येथे राजीव कपूर यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी आवर्जुन राज कपूर यांच्याविषयीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली होती आणि संपूर्ण परिवाराने पुतळ्याला भेट देत अभिवादन केले होते, अशी आठवण अरूण चोपदार यांनी सांगितली. 


"प्रेमग्रंथ' चित्रपटासाठी शिवाजी सावंत प्रॉडक्‍शन मॅनेजर होते. त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होतो. यानिमित्ताने कपूर घराण्यातील सर्व सदस्यांशी संबंध आला. या घराण्याला कोल्हापूरबद्दल नितांत आदर असल्याची प्रचिती यावेळी आली होती, असे मिलिंद अष्टेकर यांनी सांगितले. 

तीन पिढ्यांना आदर 
चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर आणि सारे कुटुंब शुटींगच्या निमित्ताने येथे वास्तव्यास होते. भालजी पेंढारकर यांनी याच दरम्यान राज कपूर यांना "वाल्मिकी' चित्रपटात पहिल्यांदा संधी दिली आणि त्यांच्या अभिनयावर खूष होवून त्यावेळी पाच हजार रूपयांचे मानधन त्यांना दिले. याच रकमेतून राज कपूर यांनी मुंबईत आर. के. स्टुडिओचा पाया रचला आणि पुढे या स्टुडिओचे बॉलीवूडमधील योगदान मोठे राहिले. पुढे आर. के. फिल्म्सच्या माध्यमातून कपूर कुटुंबीय वारंवार कोल्हापुरात येत. साहजिकच या घराण्यातील तीन्ही पिढ्यांना कोल्हापूरबद्दल आदर कायम राहिला.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT