Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : यंदाही कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार? प्रशासन 'अलर्ट मोड'वर; 'या' 54 गावांवर विशेष लक्ष

जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा जास्त फटका करवीर (Karveer) तालुक्यातील ५४ गावांना बसला होता.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार संयुक्तरीत्या नियंत्रण करेल. शासनाच्या पातळीवर तशा समित्यांची नियुक्ती केली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही. मात्र, ढगाळ वातावरणामुळे जेवढी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे, तेवढीच महापूर (Kolhapur Flood) येऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, या सर्व पातळ्यांवर करवीर तालुक्यातील पूरबाधित ५४ गावांमधील यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे. प्रत्येक गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणकोणती कामे करावीत, बचावकार्य, स्थलांतर कोठे होणार, या सर्वांचा आराखडा पूर्ण केला आहे, तर आरे, चिखली, आंबेवाडी, गांधीनगर, वळीवडे आणि कोल्हापूर शहराला सर्वाधिक फटका बसत असल्याने अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे.

जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा जास्त फटका करवीर (Karveer) तालुक्यातील ५४ गावांना बसला होता. यामध्ये कोल्हापूर शहरासह चिखली, आंबेवाडी, गांधीनगर आणि वळीवडे गावांत अधिक नुकसान झाले. त्यादृष्टीने करवीर पंचायत समितीकडून पूरबाधित सर्व गावांसह जादा फटका बसलेल्या गावांकडे लक्ष दिले जात आहे. कावणे, चुये, कोतोली, महे, भुयेवाडी गावांमध्ये भूस्खलनाचा धोका असतो. या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याबाबत नियोजन केले आहे.

करवीर पंचायत समितीकडून तालुक्यातील पूरबाधित गावांकडून शाळा, आरोग्य केंद्र, स्थलांतराच्या ठिकाणांची माहिती घेतली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ही सर्व माहिती भरून त्यानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली, तर महे, शिरोली, बीड, आरे, पाडळी खुर्द, बालिंगा, नागदवेवाडी, दोनवडे, वाकरेसह अन्य गावांमध्ये प्राथमिक किंवा आपत्कालीन व्यवस्था तत्काळ मिळाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

कर्नाटक सरकारशी क्षणाक्षणाला संपर्क

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार संयुक्तरीत्या नियंत्रण करेल. शासनाच्या पातळीवर तशा समित्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. कोल्हापूर प्रशासन आणि सांगली जिल्ह्यातील प्रशासनाचे अधिकारी कर्नाटक सरकारशी क्षणाक्षणाला संपर्क ठेवणार आहेत.

करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांतील ग्रामपंचायतींकडून आपत्ती व्यवस्थापनासंबंधी सूचना दिल्या आहेत. आवश्‍यक ती सर्व माहिती एका अहवालाद्वारे घेतली आहे. त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर नियोजनानुसार काम केले जाईल.

-विजय यादव, गटविकास अधिकारी, करवीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT