On the administration of the University in the Council 
कोल्हापूर

अधिसभेत विद्यापीठ प्रशासन धारेवर 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डायरी व कॅलेंडरमध्ये चुका राहिल्याने सदस्यांनी अधिसभेत प्रशासनाला आज धारेवर धरले. डायरीवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा न छापणाऱ्या डायरी समितीला शिवरायांची ऍलर्जी आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत डायरीत चुका करणाऱ्यांवर खर्च वसुलीसह कारवाई करावी, असा पवित्रा त्यांनी घेतला. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी त्याबाबतचा खुलासा मागवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गतवेळच्या आधीच सभेतील विषयासंबंधीच्या चर्चा, सभा त्यागाचा उल्लेख का केला नाही?, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. 

प्रा. प्रताप पाटील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत अधिकारी व सदस्यांच्या मुदती संपतील. मात्र ठोस निर्णय होणार नसतील तर विद्यापीठाची बदनामी होत राहील. स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर सभात्यागाचा उल्लेख इतिवृत्तात का नाही?, अशी विचारणा केली. प्रकाश शंकर कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या डायरेक्‍ट झाल्याचे निदर्शनास आणले डायरीत आयुक्तांचे नाव चुकीचे छापले छापण्याची सांगताच श्रीनिवास गायकवाड यांनी समितीला शिवरायांची ऍलर्जी आहे का? असा प्रश्न केला खर्च कोणाच्या कोणाकडून वसूल करायचा? अशी विचारणा करतात केल्यानंतर भैया माने यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करत निषेध व्यक्त केला. 

प्रा. मधुकर पाटील यांनी डायरी करणाऱ्या संबंधितांचे निलंबन करावे अथवा त्यांनी सभागृहात येऊन दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. डायरीवर शिवरायांची प्रतिमा न छापणे म्हणजे शिवरायांच्या विचारांचा अपमान असून, त्याचे आम्ही समर्थन करतो असा मेसेज समाजात जाईल, असे स्पष्ट केले. तसेच चौकशी समित्यांचे काय होते, याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. 

प्रशासनाच्या ढिलाईचा आरोप 
डायरी व कॅलेंडरमधील चुकांवरील कारवाईबाबत प्रा. प्रताप पाटील यांनी प्रशासन ढिलाई करत असल्याचा आरोप केला. प्रशासन विद्यापीठाची वाट लावणार का? सुधारणा करणार की नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT