admission of engineering and pharmacist start from today in kolhapur 
कोल्हापूर

इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेश प्रक्रिया आजपासुन ; यंदा मात्र प्रवेशाच्या दोनच फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : राज्य सामायिक प्रवेश कक्षातर्फे अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया आजपासून ऑनलाईन सुरू झाली.

पॉलिटेक्‍निकप्रमाणे पदवीच्याही प्रवेशाच्या यंदा दोनच फेऱ्या होणार आहेत. कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रिया लांबल्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन फेऱ्या कमी झाल्या आहेत. १५ डिसेंबरअखेर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. अठरा डिसेंबरला कच्ची गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल. यावर वीस डिसेंबर अखेर हरकत घेण्याची मुदत आहे. २२ डिसेंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. अठ्ठावीस डिसेंबरला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी लागेल.

इंजिनिअरिंग, फार्मसी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कोरोनामुळे सीईटीची परीक्षा उशिरा झाल्याने तब्बल चार महिने उशिरा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाईन पद्धतीने http://fe२०.mahacet.org या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ८०० तर मागासवर्गीयासाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यासाठी १५ डिसेंबरअखेर अर्ज सादर करण्याची मुदत आहे. याच कालावधीत मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच आंभियांत्रिकी महाविद्यालये अर्ज सुविधा केंद्र आहेत. बावीस डिसेंबरला पहिल्या फेरीसाठी प्रवर्गानुसार उपलब्ध असणाऱ्या संस्थानुसार जागांचा तपशील जाहीर होणार आहे. दोनच फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना विचारपूर्वक विकल्प भरावे लागणार आहेत. पहिल्या फेरीला पूर्वीसारखाच पहिला विकल्प सक्तीच आहे. चार जानेवारीपासून नियमित वर्गांना प्रांरभ होणार आहे.  

फेरीचे स्वरूप                                           कालावधी
 

  पहिली विकल्प फेरी                                २३ ते २५ डिसेंबर
  पहिली विद्यार्थ्यांची यादी                           २८ डिसेंबर
  संस्था प्रवेशासाठी मुदत                            २९ ते ३१ डिसेंबर
  दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील     १ जानेवारी
  दुसरी विकल्प फेरी                                 २ ते ४ जानेवारी
  दुसरी यादी                                            ६ जानेवारी
  संस्था प्रवेशासाठी मुदत                            ७ ते ९ जानेवारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT