Admission to NMC will be closed Officers staff interrupted 
कोल्हापूर

नागरिकांसाठी कोल्हापूर महापालिकेचे द्वार बंदच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने आजपासून महापालिकेत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.यामध्ये अत्यावश्‍यक कामे वगळली आहेत. आजपासून पंधरा दिवस याची अंमलबजावणी होणार आहे.
कोरोना काळात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. अनेक प्रकारची कामे महापालिकेला करावी लागत आहेत.

सर्वेक्षणापासून ते अगदी औषध फवारणी, रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापर्यंतची जबाबदारी महापालिकेवर आहे. ही सर्व कामे करत असताना महापालिकेच्या अनेक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना योद्धाच जर या काळात आजारी पडले तर ही बाब चांगली नसल्याने आणि त्याचा पालिकेच्या कार्यक्षमेतेवर परिणाम होत असल्याने आजपासून महापालिकेने महापालिकेतील प्रवेश बंद केला आहे.

केवळ अत्यावश्‍यक कामासाठीच प्रवेश मिळेल. याबाबतचा निर्णय नुकताच महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आजपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. आज महापालिकेचे प्रवेशद्वार बंद केले होते. केवळ कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. तसेच अत्यावश्‍यक कामासाठी येणाऱ्या नागरिकांची चौकशी करून अथवा काम अत्यावश्‍यक आहे का?हे पाहून प्रवेश देण्यात येत होता. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT