The admission process for the eleventh class 
कोल्हापूर

अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशी होणार ; वेळापत्रक लवकरच जाहीर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर  - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दहावीचा निकाल उशिरा लागला. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियाही लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होण्यास उशीर लागणार आहे. यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार असून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची मूळ प्रतही प्रत्यक्ष महाविद्यालयात न देता, तीही ऑनलाईनच द्यायची आहे. सध्या यासाठी बनवलेल्या संकेतस्थळाची पाहणी सुरू असून लवकरच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अशी माहिती शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी दिली.

कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण विभागाला बसला आहे. शालांत परीक्षा रद्द झाल्या. तर दहावीचा निकालही नेहमीपेक्षा उशिराच लागला. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियाही पुढे गेली. शहरातील 33 महाविद्यालयांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.

गेल्यावर्षीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत महाविद्यालयात जाऊन द्यावी लागत असे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा अर्जही ऑनलाईनच सबमीट करायचा आहे. सध्या या प्रक्रियेची चाचणी सुरू आहे. यामध्ये डमी अर्ज संकेतस्थळावरून पाठवून त्याची चाचणी सुरू आहे. शिक्षण उपसंचालक विभागाकडून लवकरच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. 


शहरातील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीची बैठक झाली. यावर्षी पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाईल, असा निर्णय बैठकीत झाला. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चार दिवसांत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. 
- सत्यवान सोनवणे, शिक्षण उपसंचालक  

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT