After the assurance of compensation, the relatives took the body into custody. Read it 
कोल्हापूर

भरपाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला मृतदेह, कुठे ते वाचा

प्रकाश कोकीतकर

सेनापती कापशी : तमनाकवाडा (ता. कागल, ता. कोल्हापूर) येथील तरुण शेतकऱ्याचा तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. आज दुपारी तीनच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी वीज तारा तपासत असताना हे निदर्शनास आले. अमोल शिवाजी घेवडे (वय 31) असे या तरुणाचे नाव आहे. वीज कंपनीवर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पत्नी आणि लहान दोन मुली असलेल्या या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी: अमोल घेवडे याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. आज त्यावर कौले घालण्याचा मुहूर्त होता. तो काल रात्री कामानिमित्त बाहेर गेला. मात्र सकाळपर्यंत तो घरी आलाच नाही. पाहुणे घरी आले, घरावर कौले घालण्याच्या धावपळीत त्याचा शोध घेऊन काही समजले नाही. आज दुपारी तीनच्या सुमारास तमनाकवाडा ते कापशी मार्गावरील आंबेओहोळ फुलाच्या पुर्वेकडील बाजूस वीज कंपनीचे कर्मचारी तपासणी करत होते. त्यांना ओढ्यालगतच्या वीज तारा तुटलेल्या आढळल्या. तर एम.के. चौगले यांच्या शेतात विजेच्या तारेला चिकटलेल्या अवस्थेत हा तरुण आढळला. त्यांनी पोलिसात कळविले. गावात हे वृत्त समजताच कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह नागरिकांची रीघ लागली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका चांगल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक आक्रमक झाले. कंपनीने नुकसान भरपाई जाहीर केल्याशिवाय मृतदेह हलवायचा नाही, अशी भूमिका नातेवाईक दयानंद साळवी, महादेव साळवी आणि कुटुंबीयांनी घेतली. त्याच्या मागे पत्नी अनिता, श्रावणी (वय 7) आणि सानवी (वय 2) अशा दोन मुली असा त्याचा परिवार आहे. 

मदतीचे आश्वासन 
रात्री आठ वाजता वीज कंपनीचे अभियंता शिवाजी गावडे यांनी घटनास्थळी भेट देवून तातडीचे वीस हजार रुपये आणि कंपनीकडून जास्तीत जास्त मिळणारी चार लाख रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह मुरगूड येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT