after lip enjury surgery football player play on ground in kolhapur
after lip enjury surgery football player play on ground in kolhapur  
कोल्हापूर

ओठांवर अकरा टाक्‍यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो खेळतो फुटबॉल...

संदीप खांडेकर

कोल्हापूर - जैन समूह व्यापार, उद्योगात गुंतल्याने कोल्हापुरातल्या फुटबॉलमध्ये त्यांचा आकडा नगण्यच. त्याला छेद देण्याचे काम प्रतिभानगरातल्या जिगर महेंद्र राठोड याने केले आहे. प्रतिभानगरात राहणारा जिगर फुटबॉल मैदानावर गोलक्षेत्ररक्षणात ‘जिगर’बाज खेळाचे दर्शन घडवतोय. शालेय जीवनातील फुटबॉलचे वेड त्याच्या अंगातून हटायला तयार नाही. सकाळी सराव, त्यानंतर कंपनीच्या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतलेय. त्याच्या या हटके अंदाजाने फुटबॉल वर्तुळात चर्चेचा माहोल तयार झाला आहे. 

शालेय जीवनापासून फुटबॉल वेड

केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत यंदा तो फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळात दाखल झाला. तीन सामन्यात त्याने गोलक्षेत्ररक्षणात कसूर केली नाही. बालगोपाल तालीम मंडळाविरूद्धच्या सामन्यात त्याच्या ओठांना दुखापत झाली. अकरा टाक्‍यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर तो मैदानात उतरला. खंडोबा तालीम मंडळाच्या (अ) सामन्यात तो अखेरची पंधरा मिनिटे मैदानात होता. दिलबहार तालीम मंडळाला (अ) फुलेवाडीने ३-०ने हरविले. त्या सामन्यात तोच गोलरक्षक होता. त्याच्या गोलरक्षेत्ररक्षणातील कौशल्याची चर्चा त्या वेळी मैदानावर रंगली. 

गोलरक्षणात तो परफेक्ट

तो शांतिनिकेतनमधून शालेय फुटबॉल खेळला आहे. त्याच्या उंचीमुळे प्रशिक्षक सूरज चव्हाण यांनी गोलरक्षक करण्याचा निर्णय घेतला. जळगावमध्ये झालेल्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा केएसए संघात तो गोलरक्षक होता. स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात त्याने दोन फटके अडवून संघाला पुढील फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा केएसए संघाने अंतिम सामना ५-० ने जिंकण्याची कामगिरी केली होती. बारावीनंतर जिगर बंगळूरमधील जैन युनिव्हर्सिटीत दाखल झाला. तीन वर्षांचा बीबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो मे २०१८ मध्ये कोल्हापुरात परतला. जैन युनिव्हर्सिटीत असताना तो वरिष्ठ गोलरक्षक म्हणून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत खेळला होता. येथे परतल्यानतंर सिक्‍स साईड स्पर्धेत खेळत होता. यंदाच्या हंगामात त्याला गोलरक्षक म्हणून सहभागी होण्याची फुलेवाडीकडून ऑफर आली होती. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर तो फुलेवाडीत सहभागी झाला. 

वडिलांचे मार्गदर्शन... 

जिगर ‘बीबीए’चा पदवीधर आहे. वडील महेंद्र राठोड यांची शिरोली एमआयडीसीत कंपनी असून, तेथे कास्टिंग मॅन्युफॅक्‍चरिंगचे काम चालते. वडिलांकडून त्या कामातील मार्गदर्शन तो घेत आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेस सराव झाल्यानंतर तो थेट कंपनीत जाऊन काम करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT