After working in the courier service father has taken on the responsibility of educating his children 
कोल्हापूर

दररोज ८० किलोमीटरचा सायकल प्रवास करीत त्यांनी तीन मुले केली उच्चशिक्षित...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - स्वाधारनगरमधील होतकरू वडिलांच्या कष्टाने मुलांच्या जीवनात शिक्षणाचा अंकुर फुलला आहे. कुरिअर सेवेत काम केल्यानंतर एमआयडीसीमध्ये मजुरीचे काम करूनही मुलांच्या शिक्षणाचा भार त्यांनी पेलला आहे. बी. कॉम. असलेल्या या वडिलांची मुलगी प्रीतीने बी. फार्मसीचा, तर दिव्याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मुलगा प्रभू ऊर्फ प्रेम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. या होतकरू वडिलांचे नाव सुखदेव कदम.

मुलांच्या शिक्षणाचा फुलला अंकुर

सुखदेव कदम मूळचे पुसेसावळ (ता. खटाव, जि. सातारा) येथील आहेत. त्यांच्या आईचे १९८३ मध्ये निधन झाले. एक वर्षानंतर वडिलांनीही साथ सोडली. सांगलीतील नेमगोंडा पाटील नाईट कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापुरात स्थायिक झाले. कुरिअर पोचविण्याचे काम त्यांना मिळाले. दिवसाकाठी ८० किलोमीटरचा सायकल प्रवास करीत त्यांनी हे काम आनंदाने स्वीकारले. 

रोजची धावपळ असतानाही जेमतेम वेतनात ते कुटुंब चालवत होते. मुलांच्या शिक्षणात त्यांनी तडजोड मात्र केली नाही. पोटाला चिमटा देऊन काही रक्कम ते आवर्जून शिक्षणासाठी बाजूला काढत होते. सणावाराला कपडे घ्यावेत, असा हट्टही मुले वडिलांचे काबाडकष्ट पाहून करायचे नाहीत. त्यांची थोरली मुलगी प्रीतीने जवाहरनगर हायस्कूलमधून दहावीला ८०.८० टक्के गुणांची कमाई केली. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयातून ती विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाली. 

पेठवडगावच्या अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीमधून तिने फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दिव्याची शालेय अभ्यासातील घोडदौडही उत्तम राहिली. बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर तिने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. प्रेम सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

जे. आर. मोटवाणी यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सहकार्य मिळत होते. कुरियर पोचवण्याचे काम करताना सायकलवरून दररोज ऐंशी किलोमीटरचा प्रवास करत होतो. प्रत्येक घटकाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. मुलांच्या शिक्षणासाठी कुरियरची नोकरी सोडून मी व माझी पत्नी शोभा हिने गोकुळ शिरगाव एमआयडीसीत काम मिळवले. आजही मी सायकलवरुनच प्रवास करत एमआयडीसीत जातो.
- सुखदेव कदम
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT