Agitation by teachers non-teaching staff to implement old pension scheme politics sakal
कोल्हापूर

Old Pension Scheme: जुनी पेन्‍शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन!

Old Pension Scheme: महाराष्ट्र राज्य कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्‍शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन, महापालिका कर्मचारी संघाने संपूर्ण पाठींबा

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur News : महाराष्ट्र राज्य कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्‍शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. त्याला महापालिका कर्मचारी संघाने संपूर्ण पाठींबा दिला आहे.

त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात महापालिकेचे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता कायम तसेच रोजंदारीवरील साडेतीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे पत्र संघाने महापालिका प्रशासनाला दिले आहे.

पाणीपुरवठा वितरण, अग्निशमन विभाग व आरोग्य सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्व आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाराही आहेत.राज्यभरातील संघटनेने आंदोलनाची हाक दिली असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

यावेळी उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे व जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले, खजानिस सिकंदर सोनुले, अनिल साळोखे, अभिजीत सरनाईक, महादेव कांबळे, मारूती दाभाडे, अन्वर शेख, अनिता रूईकर उपस्थित होते. त्यानंतर आज संघाने प्रशासनाला पत्र दिले.

प्रशासनाकडून कामावर येण्याचे आवाहन केले असले तरी अत्यावश्‍यक सेवा वगळली असल्याने इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असे संघाने कळवले आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता महापलिकेसमोर जमण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे.

केएमटी सहभागी नाही

केएमटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार नसल्याने केएमटी सेवा सुरू राहणार असल्याचे मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT