Agriculture Bill and Labor Bill against kolhapur Protest on behalf of Congress 
कोल्हापूर

केंद्राने दोन पावले मागे यावे ; कॉंग्रेस नेत्यांची मागणी

सुयोग घाटगे

कोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेले शेती विधेयक आणि कामगार विधेयक हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या हिताचे नसून याचा विरोध करण्यासाठी पापाची तिकटी, येथील गांधी पुतळ्यासमोर कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, महापौर निलोफर आजरेकर, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस देविदास बनसोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 


गांधी जयंती निमित्याने कॉंग्रेसच्या वतीने शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. या निमित्ताने पापाची तिकटी परिसरातील गांधी पुतळ्यासमोर.जिल्हा व शहर कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस महिला कॉंग्रेस च्या वतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेले विधेयक हे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडणारे असल्याचे या वेळी म्हणण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवत न्यायाची मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, भाजपा सरकार हे शेतकरी आणि कामगार विरोधी सरकार आहे. कामगारांच्या आणि शेतकरी वर्गाच्या अडचणी वाढवण्याचे निर्णय घेण्याचे काम हे सरकार करत  आहे.या सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा. केंद्राने दोन पावले मागे घेण्याने या अन्यायी कायद्यातून शेतकरी कष्टकऱ्यांची सुटका होईल. या वेळी मोदी, योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी युवक कॉंग्रेसचे दिपक थोरात, नगरसेवक सचिन चव्हाण, शोभा कवाळे, सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, वैशाली महाडीक आणि पदाधिकारी उपस्थीत होते.  
संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT