agriculture sakal
कोल्हापूर

kolhapur : १४ गुंठ्यांत २१ टन टोमॅटो उत्पादन

मौजे सांगावातील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; पाच महिन्यांत ११ लाखांचे उत्पादन

कृष्णात माळी

कसबा सांगाव : शिवाजीनगर (मौजे सांगाव) येथील अमोल अर्जुन पाटील या युवा शेतकऱ्याने १४ गुंठ्यांत २१ टन टोमॅटो उत्पादन घेऊन सुमारे ११ लाखांचा नफा मिळविला. पारंपरिक ऊस पीक उत्पादनाला फाटा देत शेतीत धाडसी निर्णय करून घेतलेले उत्पादन अन्य शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.

विशेष म्हणजे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील खासगी कंपनीत काम करत असतानाही त्याचे शेतीतील यश उल्लेखनीय आहे.

सांगाव परिसरात बहुतांश शेतकऱ्याकडून ऊस पीक घेतले जाते. ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर काही शेतकरी भाजीपाला पिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात. वृक्षसंवर्धन, रोपांचे कलम आदींची आवड असणाऱ्या अमोलने असाच प्रयत्न करण्याचे ठरविले आणि टोमॅटो पिकवण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या प्रयत्नात पिकांसह कमी दराचा फटका बसल्याने त्याचे नुकसानही झाले, पण खचून न जाता फेब्रुवारीच्या सुमारास १४ गुंठ्यांत साधारण ३६०० टोमॅटो रोपांची लागण केली. भगवान तोडकर, विजय पाटील, कृष्णात पाटील या शेतीतील माहितगार व्यक्तींचा सल्ला घेतला. सातत्याने पीक पाहणी करून खते आणि औषध फवारणी केली. लागण केल्यानंतर साधारण अडीच महिन्यांनी सुरू झालेली तोड पुढील दोन महिने सुरू राहिली. अवघ्या पाच महिन्यात टोमॅटो पीक घेऊन पुन्हा नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न अमोल ने सुरू केला आहे.

सकस आणि चांगल्या प्रतीचा फळ भाजीपाला पिकवणे ध्येय आहे. खर्चिक शेतीची अनास्था वाढल्याने गट शेती, अवजारे बँक, बीज बँक, औषधे आणि खतनिर्मितीसाठी जोमाने काम करण्याचे ठरविले आहे. मिळालेल्या उत्पन्नात समाधानी आहे

- अमोल पाटील, युवा शेतकरी, मौजे सांगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT