Agriculture Wages Rates Doubled In Rural Area Kolhapur Marathi News
Agriculture Wages Rates Doubled In Rural Area Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

औताचे दर झाले दुप्पट 

रणजित कालेकर

आजरा : "लॉकडाऊन'चा परिमाण शेतीवरही झाला आहे. शेती मशागतीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट दराने बैलजोडीचे औत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर शेतीकामासाठी मजूरही मिळेनासे झाल्याने मजुरीचे दरही वाढले आहेत. आजरा तालुक्‍यातील हे चित्र आहे. 

या काही वर्षात शासनाने कृषी यांत्रिकीकरणाची योजना आणली. यासाठी अनुदान दिले. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी यांत्रिक औजारे खरेदी केली. आजरा तालुक्‍यातही या योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे गावा-गावांत पॉवर ट्रिलर, ट्रॅक्‍टर यासारखी शेती मशागतीची यंत्रे दिसत आहेत. हे एक आशादायक चित्र एकीकडे असताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलरसारखी यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे बैलजोडीच्या औताचे दर दुप्पट झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी 800 रुपये दराने औतणीचा दर होता. तो आता 1200 ते 1500 रुपयांपर्यंत गेला आहे. 

तालुक्‍यातील प्रत्येक गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांकडे बैलजोड्या आहेत. त्यांना चांगला भाव आला असून, शेतकरी बैलजोड्या असलेल्या शेतकऱ्यांच्या दाराला हेलपाटे मारत आहेत. सध्या ऊस भरणीचे काम सुरू आहे; पण मशागतीसाठीची यंत्रणाच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तिष्ठत बसावे लागत आहे. एप्रिलअखेरीला खरिपाच्या कामांना जोर येणार आहे. नांगरट, जमीन तयार करणे यासारखी कामे करण्यास सुरवात होणार आहे. लॉकडाऊनचा कालवधीनंतर पुढे परिस्थिती काय असेल, याचा अंदाज येत नसल्याने शेतकऱ्याची काळजी वाढली आहे. त्यांना यातून मार्ग कसा काढावयाचा यांची काळजी लागून राहिली आहे. 

कामे ठप्प
ग्रामीण भागात खत व शेतीपूरक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. वेळेत खते व औषधे उपलब्ध न झाल्यास याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे. डिझेल व पेट्रोल मिळत नसल्याने मशागतीची कामे ठप्प आहेत. 
- संताजी सोले, प्रगतिशील शेतकरी, पेरणोली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT