Ajara market will be open ten to six Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यात उद्या दहा ते सहापर्यंत बाजारपेठ खुली

वृत्तसंस्था

आजरा : उद्या शनिवार (ता. 21) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेतच बाजारपेठ खुली ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. नागरिक व ग्राहकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. कोरोनोबाबत प्रशासनाने व्यापाऱ्यावर केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर येथील तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. तहसीलदार विकास अहिर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

तहसीलदार अहिर म्हणाले, ""कोरोनामुळे देशात व राज्यात तयार झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाला काही निर्णय घेणे भाग पडत आहे. या रोगावर मात करण्यासाठी पुरेशी दक्षता बाळगावी लागत आहे. त्यामुळे आठवडी बाजार व अन्य कार्यक्रम स्थिगीत करण्याचे आदेश देण्यात आले असून बाजारपेठ व अन्य ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे वैयक्तीक हिताचा विचार न करता समाजाचा विचार करा.'' 

कारवाईबाबत काही व्यापाऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे म्हणाले, "आठवडी बाजार बंद ठेवल्याबाबत शहर व खेडेगावातील नागरिकांना पुरेशी कल्पना आली नाही. त्यामुळे गर्दी झाली. इथून पुढे प्रशासन व व्यापारी यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे. गुढी पाडव्याचा बाजार यामुळे ग्राहक शहरात आले होते.'' जनार्दन टोपले म्हणाले, ""आठवडी बाजार त्यात पाडव्याचा बाजार व लोकांच्यात तयार झालेला संभ्रम यामुळे गोंधळ उडाला.

नियोजन करण्यात नगरपंचायत प्रशासन कमी पडले.''' नंदकुमार गजरे, राहुल मांडेकर, शिवाजी गुडूळकर, तेरणी, आनंदा फडके, नौशाद बुड्डेखान, सचिन इंदलकर, भास्कर बुरुड यांनी सुचना मांडल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणाले, ""कोरोनाबाबत वरीष्ठ पातळीवरून जसे आदेश मिळतात त्याप्रमाणे प्रशासनाला कारावाई करावी लागते. जाणून बुजून कोणाला त्रास देण्याचा भाग नाही. प्रशासनाला सहकार्य करावे.'' भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, रविकांत मांगले, मनोज गुंजाटी, संजय इंगळे यांच्यासह शहरातील प्रमुख व्यापारी, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, संजय इंगळे आदी उपस्थित होते. 

सोमवारनंतर बैठक 
कोरोनामुळे वरीष्ठ पातळीवरून आदेश येत असतात. त्यानुसार नियोजन आखले जाते. रविवारी (ता. 22) बंद देशभर बंद पाळला जात आहे. त्यामुळे सोमवारनंतर बैठक घेवून पुढील नियोजनाची कल्पना व्यापारी असोसिएशनला दिली जाईल. व्यापारी असोसिएशनने प्रशासनाच्या संपर्कात रहावे. 

आजऱ्याची रंगपंचमी बंद 
पारंपारिक पध्दतीने आजरा शहरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. मंगळवारी (ता. 24) रंगपंचमी होणार होती, पण ही रंगपंचमी बंद ठेवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT