Ajit Pawar visit Kolhapur  esakal
कोल्हापूर

कोल्हापूर शहराची लवकरच हद्दवाढ? अजितदादांनी हद्दवाढीचा चेंडू पुन्हा ढकलला स्थानिक नेत्यांच्या कोर्टात!

रंकाळा सुशोभीकरण, अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर विकास आराखडा यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

सकाळ डिजिटल टीम

'कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. रंकाळा हे येथील महत्त्वाचे ठिकाण असून, कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.'

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय स्थानिक पातळीवर झाला पाहिजे. त्यानंतर त्यासाठी लागणारा निधी, भविष्यातील तरतुदींसाठी नियोजन आणि विकासकामांचे आराखडे याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हद्दवाढीचा चेंडू पुन्हा स्थानिक नेत्यांच्या कोर्टात ढकलला.

त्याचबरोबर रंकाळा सुशोभीकरण, अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर विकास आराखडा यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी बैठक घेतली.

यावेळी त्यांनी विविध विकासकामांच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाला विचारणा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, असे विधान श्री. पवार यांनी गेल्यावेळी केले होते. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवला गेला पाहिजे. त्यानंतर हद्दवाढीसाठी लागणारा निधी, नियोजित शहराचा आराखडा, त्याची अंमलबजावणी यासाठी राज्य सरकार निधी देईल.’ त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न स्थानिक नेत्यांनीच सोडवावा असे त्यांनी सूचवले.

जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतना श्री. पवार म्हणाले, कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. रंकाळा हे येथील महत्त्वाचे ठिकाण असून, कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. श्रीक्षेत्र अंबाबाई व श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याप्रमाणेच रंकाळ्याचा विकास आराखडा तयार करा. यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी रंकाळ्याच्या तटबंदीची दुरुस्ती करून घ्या, झाडांना पार बांधून घ्या, सार्वजनिक ठिकाणच्या वास्तूंची डागडुजी त्या-त्या वेळीच करून घ्या, विकासकामे करण्यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमा अशा सूचना त्यांनी दिल्या.

ही कामे करताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याचे कटाक्षाने पालन करा. रंकाळ्यासह शहर परिसरात दैनंदिन साफसफाई होत असल्याची पाहणी करून शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा. इमारतींचा विकास करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांची आश्वासने

  • - दसरा महोत्सव १० दिवसांचा करू

  • - शाहू मिल स्मारकासाठी निधीची तरतूद करू

  • - माणगाव स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही

  • - काळम्मावाडी धरणाची डागडुजी २ टप्प्यात करणार

  • - केशवराव भोसले नाट्यगृह टप्पा-२ साठी लवकरच निधी

महापालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे

बैठकीत अजित पवार म्हणाले, ‘मी आज सकाळी ६ वाजता बाहेर पडलो. मला रस्त्यावर पथदिवे सुरू दिसले नाहीत. एकही सफाई कर्मचारी दिसला नाही. रंकाळा हा ऐतिहासिक तलाव आहे. मात्र, त्याच्या पदपथाला तारेचे कुंपण आहे. फरशा उखडलेल्या आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी शहरातून फिरले पाहिजे. त्यांनी केवळ केबिनमध्ये बसून काम करू नये.’

वाचाळवीरांना उत्तर देत नाही

आमच्याही तालमीत या असा टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला होता. याबद्दल विचारले असता मंत्री पवार म्हणाले, ‘राज्यात २८८ आमदार आणि ४७ खासदार आहेत. प्रत्येकाच्या विधानाला उत्तर देता येणार नाही. आम्ही विकासाची कामे करतो. त्यात काही चुकले असेल तर टीका करा आम्ही उत्तर देऊ. मात्र, वाचाळवीरांना उत्तर देण्यास मी बांधिल नाही.’

इंडिया आघाडीत बिघाडी

इंडिया आघाडीवर टीका करताना अजित पवार म्हणाले, ‘बिहारचे नितीशकुमार एनडीएमध्ये आले. पंजाब आणि दिल्लीमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्येही अखिलेश यादव यांनी सर्वाधिक जागा लढवणार असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता इंडिया आघाडीतच वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT