Hasan Mushrif vs Samarjeetsingh Ghatge esakal
कोल्हापूर

Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

लोकसभेचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय महायुतीतील तीनही घटक पक्ष मिळून घेतील.'

पुणे : लोकसभेचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना आणि भाजपच्या महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय महायुतीतील तीनही घटक पक्ष मिळून घेतील; परंतु पक्षाने मला संधी दिली तर, मी कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवेन, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (ता. ५) येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital Pune) तृतीयपंथी रुग्णांसाठी विशेष कक्षाच्या (वॉर्ड) उद्‍घाटन कार्यक्रमासाठी मुश्रीफ (Hasan Mushrif) पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, या घोषणेमुळं कागलच्या समरजीत घाटगे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला होता.

ससूनमध्ये या रुग्णालयातील विविध सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा आणि अन्य विभागांतील कामांचा आढावासुद्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्रीरामांबाबत व्यक्त केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, ‘‘आस्थेची भावना असते आणि त्यातून असे बोलणे प्रत्येकाने टाळले पाहिजे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी खासदारकीमुळे त्यांच्या मूळ व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याचे वक्तव्य केले होते. एवढेच नव्हे, तर राजकारण सोडणार असल्याची घोषणाही कोल्हे यांनी केली होती आणि या घोषणेनंतर तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT