कोल्हापूर

भिलवडी बाजारपेठेची अजित पवार यांच्याकडून बोटीतून पाहणी

अर्चना बनगे

भिलवडी (सांगली) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी (Bhilvadi) गावांमध्ये शाळेत जाऊन पूरछावणीला भेट दिली. या शाळेमध्ये पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. पूरग्रस्तांची राहण्याची, जेवणाची सोय आहे का? याची विचारपूस केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी भिलवडी गावातील बाजारपेठेची पाहणी केली. सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावाला पुराचा मोठा फटका बसतो यावर्षीही या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी या गावांना भेटी देऊन तेथील पाहणी केली.

यावेळी पवार म्हणाले, भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भिलवडी बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बोटीतून पाहणी

येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT