In Ajra-Chandgad Area, There Is An Offering Of Mutton To Rats Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

"या' परिसरात उंदरुपीला असतो मटणाचा नैवेद्य...वाचा आगळी-वेगळी परंपरा

सुनील कोंडुसकर

चंदगड : सण, उत्सव माणसाच्या मनाला विरंगुळा देतात. ते साजरे करण्याच्या पध्दती प्रदेशानुसार बदलत जातात. एखादी प्रथा रूढ होते. ती परंपरेचाच भाग बनून जाते. चंदगड-आजरा तालुक्‍यात गणेश चतुर्थीमध्ये उंदरूपीचा सण मांसाहारी नैवेद्यामुळे लक्ष वेधून घेतो. ऋषी पंचमीला गणेशाचे वाहन असलेल्या उंदरूपीला मान दिला जातो. या दिवशी उंदरीला बाजूला घेऊन मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. 

गणपती हे दैवत शाकाहारी आहे. परंतु त्याचे वाहन असलेल्या उंदरुपीला मात्र मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. चंदगड, आजरा तालुक्‍यात मृगाला सुरु झालेला पाऊस सतत बरसत असतो. वातावरणात थंडी असते. पाऊस आणि थंडीच्या वातावरणात शेतात कष्ट करावे लागल्याने शरीराला थकवा आलेला असतो. त्यातच श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो. शरीराची उष्णता वाढवण्यासाठी मांसाहार आवश्‍यक मानला जातो.

श्रावण नुकताच संपलेला असतो आणि चतुर्थीच्या सणाला सुरवात झालेली असते. अशा वेळी उंदरुपीच्या निमित्ताने मांसाहार करुन आनंद मिळवला जातो. अलिकडच्या काळात अनेकजण घरगुती गौरी गणपती विसर्जनानंतर, तर काहीजण अनंत चतुर्थी नंतरच घरात मांसाहार करतात. परंतु बहुतांश घरात प्रथा म्हणून उंदरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. उजव्या बाजूला गणपतीसाठी शाकाहारी, तर डाव्या बाजूला उंदरीसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर कुटुंबातील सर्वजण मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतात.

उंदरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पहाटे शेतात नेऊन पिकांवर मारला जातो. त्यामुळे शेतात उंदरांचा त्रास कमी होतो असा समज आहे. दुसरीकडे निसर्गातील प्रत्येक प्राणी हा अन्नसाखळीचा एक भाग आहे आणि त्याचे अस्तित्व अबाधित आहे हे सुध्दा सांगण्याचा हा प्रयत्न आहे. चंदगड तालुका आणि आजरा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागात ही प्रथा पहायला मिळते. या वर्षी कोरोनामुळे सण, उत्सवाला मर्यादा आल्या असल्या तरी आपापल्या परीने प्रथा, परंपरा सांभाळल्या जात आहेत. आज विविध ठिकाणी मटण खरेदीसाठी गर्दी पाहता त्याला दुजोरा मिळतो. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT