In Ajra Taluka, Paddy Production Will Decrease By 4% This Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा तालुक्‍यात "या' रोगांमुळे यंदा भात उत्पादन चार टक्‍क्‍याने घटणार

रणजित कालेकर

आजरा : करपा, कडा करपा व तांबेरा रोगांमुळे भात पिकावर यंदा परिमाण झाला असून भात उत्पादनात चार टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. हे वगळता तालुक्‍यातील पिक परिस्थिती चांगली आहे. या आठ दहा दिवसात हळव्या जातीच्या भाताच्या कापणीला तसेच सोयाबीन काढणीला सुरवात होणार आहे. दरम्यान, तालुक्‍यात पावसाची उघड-झाप सुरू आहे. 

यंदा पिकांच्या दृष्टीने तालुक्‍यातील हवामान व पाऊसमान चांगले राहिले. जुलैअखेर पावसाने दडी दिली. त्याचबरोबर हवामान कुंद व ढगाळ राहिल्याने भात पिकावर रोगाचा प्रार्दुभाव झाला होता. भात पिकावर सुमारे 300 हेक्‍टर पिकावर करपा, कडा करपा व तांबेरा रोग पडला. त्यामुळे भात उत्पादनात घट येण्याची भिती व्यक्त होत होती.

याच वेळी किडीचाही प्रार्दुभाव सुरू झाला होता. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने व शेतकऱ्यांनी औषध फवारणी केल्यामुळे भात पिकावरील रोगाचा प्रार्दुभाव कमी झाला. तरी देखील काही गावात रोगाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भात उत्पादनात चार टक्के घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. तालुक्‍यात 9 हजार 700 हेक्‍टरवर भाताची लागवड झाली आहे. या आठ- दहा दिवसात कापणीला सुरवात होणार आहे.

निम गरव्या जाती फुलोऱ्याला, तर गरव्या जातीचे भात पोटरीला आले आहे. उत्तूर, भादवण व मडिलगे परिसरात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. येथे सुमारे 700 हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड झाली असून हे पिक काढणीला आले आहे. भूईमुगाची 2500, तर नागलीची 32 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड आहे. 

एक दृष्टीक्षेप
पिकांचे क्षेत्र (हेक्‍टर) 
भात ः 9700, नागली ः 3200, भुईमुग ः 2500, सोयाबीन ः 700, ऊस ः 4700 

उसासाठी अनकुल परिस्थिती 
ऊस पिकासाठी यंदा हवामान पोषक आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले व उत्पादन घटले होते. यंदा सुर्यप्रकाश चांगला असल्याने उताऱ्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस सध्या कांडी अवस्थेला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT