Aker drove away the herd of cows 
कोल्हापूर

अखेर गव्यांच्या कळपाला हुसकावून लावले

धनाजी आरडे

गारगोटी : मुदाळ, व्हनगुती, श्रीनगर वसाहतमार्गे वाघापूरच्या हद्दीत घुसलेल्या चार गव्यांच्या कळपाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग पाठलाग करून अखेर हुसकावून लावले. वेदगंगा नदीकाठावरून गव्यांचा कळप पुढे निढोरी-मुरगूडच्या दिशेने निघून गेला. यानंतर वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गव्यांचा कळप बुधवारी रात्री मुदाळ, व्हनगुतीच्या हद्दीत आला होता. त्यांनी शेतात धुडगूस घालून पिकांचे नुकसान केले. परिसरात गव्यांचा कळप आल्याचे समजताच शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आज सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती समजताच गव्यांच्या कळपाचा शोध घेतला. त्यांचा पाठलाग करून त्यांना सलग चार-पाच तास हुसकावून लावले. दुपारच्या सुमारास वाघापूरचे शेतकरी युवराज दाभोळे, तानाजीराव कुरडे यांच्या शेतातील घरानजीक मक्‍याच्या शेतात चार गवे लपून बसले होते. वन कर्मचाऱ्यांनी गव्यांवर पाळत ठेवून अखेर त्यांना तेथून हुसकावून लावले. यानंतर हा गव्यांचा कळप वेदगंगा नदीच्या काठावरून निढोरी-मुरगूडच्या हद्दीत घुसला. दरम्यान, वन कर्मचाऱ्यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT