Film Sakal
कोल्हापूर

Kolhapur : चित्रपट महामंडळासाठी पाच फेब्रुवारीला मतदान

आठ फेब्रुवारीला मतमोजणी; कोल्हापूरसह पुणे, मुंबई येथे मतदान केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक आता नव्या वर्षात पाच फेब्रुवारीला होणार आहे. आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून, कोल्हापूर, पुणे, मुंबई या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे असतील. नऊ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत महामंडळाचे सभासद मोठ्या संख्येने वाढले असले तरी साठ ते सत्तर टक्क्यांहून अधिक सभासदांनी वार्षिक वर्गणी भरली नसल्याची माहितीही आता पुढे येत आहे.

महामंडळातील सत्तारूढ आणि विरोधकांतील वादही टोकाला गेला आहे. त्यातूनच दोन्ही गटांनी परस्पर निवडणूक कार्यक्रम जाहीर केले. मात्र, धर्मादाय आयुक्त प्रदीप चौधरी यांनी हे दोन्ही कार्यक्रम रद्द करून १९ सप्टेंबरला सात दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांनी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ मागितली. त्यानुसार या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, महामंडळातील वाढलेली सभासद संख्या आणि परस्परविरोधी तक्रारींची शहानिशा झाल्यानंतरच निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फक्त सभासद यादीचाच ताळमेळ घालण्यासाठी किमान एक महिना जाईल, अशी शक्यता आहे.

वाढत्या सभासदांविषयी तक्रार

महामंडळाच्या २४ एप्रिल २०१६ ला झालेल्या निवडणुकीवेळी केवळ तीन हजार ९०० सभासद मतदानास पात्र होते. मात्र, त्या वेळी एकूण ‘अ’ वर्ग सभासद संख्या १३ हजार ६१०, ‘ब’ वर्ग चार हजार २२१, आजीव सभासद एक हजार ४१, तर सन्माननीय सभासद संख्या ९१ इतकी होती. तीन वर्षांपूर्वी हीच संख्या अनुक्रमे १९ हजार १३८, १४ हजार ९३९, एक हजार २३३ आणि १२१ अशी म्हणजेच ३५ हजारांहून अधिक होती. गेल्या दोन वर्षात आता हीच संख्या बावन्न हजाराच्या पुढे गेली आहे. एकूणच पाच वर्षांत सभासद संख्या चौपटीने वाढली आहे. महामंडळाच्या भल्यासाठी ही गोष्ट चांगली असली तरी सभासद नोंदणी अर्जांचे गठ्ठेच महामंडळात आल्याने त्याबाबत काहींच्या तक्रारी आहेत. या तक्रारींना प्रादेशिक वादाचीही किनार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT