कोल्हापूर

राज्यातील सर्व दुकाने सुरु करा; आवाडे यांची मागणी

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : संपूर्ण राज्यभरात ज्या ज्या शहर आणि गावात कोरोना (Covid 19) पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यापेक्षा खाली आहे. त्या सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवांसह इतर आस्थापना सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (c m uddhav thackeray) व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Rehabilitation Minister Vijay Vadettiwar)यांच्याकडे केली आहे. या संदर्भात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र राज्यात चार महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंधासह राज्यभरात लॉकडाऊन जारी केला आहे. सध्या ज्या भागात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यापेक्षा कमी झालेला आहे, त्याठिकाणी वेळेचे बंधन व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत इतर आस्थापना सुरु करण्यास परवानगी दिली जात आहे. त्यानुसार कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे सांगून संपूर्ण जिल्ह्यात केवळ कोल्हापूर शहरात इतर आस्थापना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य शहरे व ग्रामीण भागावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली.

आमदार आवाडे यांनी, संपूर्ण राज्यभरातील वस्तुस्थितीची विस्तृत माहिती देत चार महिन्यांपासून व्यवसाय व व्यवहार बंद असल्याने राज्यभरातील छोट्या-छोट्या व्यापार्‍यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. याचा विचार होऊन ज्या शहरात अथवा गावात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झालेला आहे, त्या त्या ठिकाणी वेळेचे बंधन व नियमांचे पालन करण्यासह इतर आस्थापना सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या संदर्भात राज्य शासनाकडून लवकरच निर्णय जाहीर करण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT