all workers The Pune-Bangalore National Highway walking travels kolhapur marathi news 
कोल्हापूर

'पाच-सहा दिवस लागतील, पण आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहचू'

सकाळ वृत्तसेवा

नागाव (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे. पुणे व सातारा जिल्ह्यात काम करणारे सुमारे दीडशे कर्नाटकी मजूर प्रवासी वाहतूक बंद असल्याने चालत प्रवास करत आहेत. हे सर्व मजूर बेळगाव व हुबळी परिसरातील असून त्यांनी चालतच गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाने चालत प्रवास करणारे हे तरुण आज सकाळी शिरोलीहून बेळगावच्या दिशेने निघाले.
पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम आणि हाॅटेल व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटकी तरुण मजूर म्हणून काम करतात. २२ मार्च पासून राज्यात आणि देशात संचारबंदी व लॉक डाऊन असल्याने या मजुरांना उपजीविकेचे साधनच उरलेले नाही. अशा परिस्थितीत आहे त्या ठिकाणी राहून आपले पोट भरणे त्यांना कठीण बनले आहे.

मजुरांना उपजीविकेचे साधनच उरलेले नाही

प्रवासा पुरते जवळ पैसे आहेत, पण प्रवासी वाहतूक बंद आहे. म्हणून या तरुणांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाने चालतच प्रवास सुरू केला आहे. पाच-सहा दिवस लागतील, पण आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहचू असे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी महामार्गावर ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हात करून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न हे मंजूर करतात. पण विविध ठिकाणी नाकाबंदी आणि कडक बंदोबस्त असल्याने त्यांना लिफ्ट देण्याचे धाडस कोणी करताना दिसत नाही. त्यामुळे चालतच त्यांना आपल्या गावी पोहोचावे लागणार आहे.

आरोग्य तपासणी  गरजेची

१४ एप्रिल पर्यंत कोरोनाची लागण नियंत्रणात न आल्यास आणखीन काही दिवसांसाठी हा लॉक डाऊन वाढण्याची शक्यता असल्याने या तरुणांनी कामाचे ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातून प्रवास करत आलेल्या या तरुणांच्या हातावर कोणत्याही प्रकारचा कोरन्टाईनचा शिक्का मारलेला नाही. कागल - कोगणोळीमधून ते महाराष्ट्राची सीमा पार करून कर्नाटकात प्रवेश करतील. मात्र त्यांची आरोग्य तपासणी कोठे होणार हे त्यांनाच माहीत नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT